¡Sorpréndeme!

छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचा वापर राजकारणासाठी करतायं | इम्तियाज जलील

2022-03-19 220 Dailymotion

राज्यात महाविकासआघाडी भक्कम आहे. जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतो. जाऊन गुडघे टेकतो. तो शिवसेना, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेचा विरोधकच आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले होते. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी राऊतांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हीच छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करतायं. आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही अल्ला शिवाय कोणालाही नतमस्तक होत नाही. असं ते यावेळी म्हणाले.